विजया राजाध्यक्ष
From Wikipedia, the free encyclopedia
डॉ. विजया राजाध्यक्ष (५ ऑगस्ट इ.स. १९३३ - हयात) या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात व एस.एन.डी.टी. विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विजया राजाध्यक्ष |
---|
विजया राजाध्यक्ष महाविद्यालयात असताना त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा त्यांचा पहिला संग्रह होता. त्यानंतर ‘विदेही’, ‘अनोळखी’, ‘अकल्पित’, ‘हुंकार’, ‘अखेरचे पर्व’, ‘उत्तरार्ध’, ‘आधी...नंतर’ असे त्यांचे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रित करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात ‘कवितारती’, ‘जिव्हार’ ‘स्वानंदाचे आदिमाया’, ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’, ‘संवाद’ ही पुस्तके प्रख्यात आहेत. ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. इ.स. २००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी भूषविले आहे.