व.पु. काळे
मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व कथाकथनकार / From Wikipedia, the free encyclopedia
वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत.[1] त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
जलद तथ्य वसंत पुरुषोत्तम काळे, जन्म नाव ...
वसंत पुरुषोत्तम काळे | |
---|---|
जन्म नाव | वसंत पुरुषोत्तम काळे |
टोपणनाव | वपु, व.पु. काळे |
जन्म | २५ मार्च १९३२ (1932-03-25) |
मृत्यू |
२६ जून, २००१ (वय ६९) मुंबई, महाराष्ट्र, माझे माझ्य्यापाशी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | स्थापत्यशास्त्र, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार |
कथा कादंबरी कथाकथन |
प्रसिद्ध साहित्यकृती | ही वाट एकटीची, पार्टनर |
प्रभाव | ओशो रजनीश |
वडील | पुरुषोत्तम काळे |
पुरस्कार | पु.भा. भावे |
बंद करा
ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत.
काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.[2]