लोकमान्य टिळक टर्मिनस
From Wikipedia, the free encyclopedia
लोकमान्य टिळक टर्मिनस हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्ला व टिळक नगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते. ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.