लॉस एंजेलस
From Wikipedia, the free encyclopedia
लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[1] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.
लॉस एंजेलस Los Angeles |
|||
अमेरिकामधील शहर | |||
|
|||
गुणक: 34°03′N 118°15′W |
|||
देश | अमेरिका | ||
राज्य | कॅलिफोर्निया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८५० | ||
महापौर | अँटोनिओ व्हिलारायगारोसा | ||
क्षेत्रफळ | १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २३३ फूट (७१ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ३७,९२,६२१ | ||
- घनता | ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ८:०० | ||
http://www.lacity.org |
दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगर व तोक्यो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[2][3] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[4][5] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.