रोखे बाजार
From Wikipedia, the free encyclopedia
रोखे बाजार किंवा शेअर बाजार (इंग्लिश: Stock exchange, स्टॉक एक्सचेंज) ही समभाग, रोखे, बाँड इत्यादी वित्तीय घटकांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घडवणारी आर्थिक संस्था आहे. येथे शेअर दलाल व व्यापारी रोख्यांची देवाण-घेवाण करतात. रोखे बाजार हा समभाग बाजार ह्या मोठ्या आर्थिक संस्थेचा एक घटक आहे. रोखे बाजारामधील व्यवहार स्थावर वास्तूमध्ये पार पाडले जातात.
रोखे बाजार म्हणजे सर्व सहभागी घटकांदरम्यान परस्परसंबंध असलेली अशी व्यवस्था असते. हिच्याद्वारे खालील गोष्टी सुकर होतात :
- रोखे खरीदणे व विकणे
- नवीन रोखे जारी करून नवे भांडवल उभारणे
- स्थावर मालमत्तेचे वित्तीय मालमत्तेत रूपांतर करणे
- फायदा मिळवण्याच्या हेतूने अल्प व दीर्घ मुदतींसाठी पैसा गुंतवणे.