रॉचेस्टर (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
रॉचेस्टर (इंग्लिश: Rochester) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (न्यू यॉर्क शहर व बफेलोखालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) ओन्टारियो सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जलद तथ्य
रॉचेस्टर Rochester |
|
अमेरिकामधील शहर | |
गुणक: 43°9′56″N 77°36′41″W |
|
देश | ![]() |
राज्य | ![]() |
स्थापना वर्ष | इ.स. १८०३ |
क्षेत्रफळ | ९६.१ चौ. किमी (३७.१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५०५ फूट (१५४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २,१०,५६५ |
- घनता | २,३६८.३ /चौ. किमी (६,१३४ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.cityofrochester.gov |
बंद करा
अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे.
येथे जॉर्ज ईस्टमनने स्थापन केलेल्या ईस्टमन कोडॅक कंपनीचे मुख्यालय आहे.
जेनेसी नदी या शहरातून वाहत ऑन्टॅरियो सरोवरास मिळते.