१७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते.त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती.सुभेदार राणोजी शिंदे यांचे सरसेनापति सरदार यशोजी रेगे आरवंदेकर होते.

राणोजी शिंदे

महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे दिवान रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले. १८१० मध्ये शिंदे घरण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली.

श्रीमंत राणोजी शिंदे यांची समाधी कुदनग्राम म्हणजे आताचे कुंडलापूर या ठिकाणी आहे त्या समाधी वरती मोडी लिपीत राणोजी घुमट असे ही लिहिलं आहे . कवठे महांकाळ तालुक्यामध्ये कुंडलापूर हे गाव आहे. कुंडलापूर हे सांगली जिल्हामध्ये येते. कुंडलापूर गावाच्या सर्व बाजूस डोंगर आहेत. डोंगरावरती पवनचक्कीचे प्रमाण जास्त आहे. डोंगराचे प्रमाण जास्त असल्यामुळे हवामान थंड आहे. कुंडलापूर गावातील हवामान थंड असल्यामुळे बुरशीचे (fungi) प्रमाण जास्त आहे.गावामध्ये लींबाचे ( Azadirachta indica ) (नीम) (Azadirachta indica, commonly known as neem. Azadirachta indica source of neem oil.)प्रमाण जास्त आहे. हवामान थंड असल्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त आहे.कुंडलापूर गावामध्ये भवानी मंदिर आहे. गावामधील लोक असं म्हतात की देवी भवानी मातेच्या नाकातील नथ चोरताना देवी भवानी मातेच नाक तोडले गेले म्हणून भवानी मातेला नाक नाही. भवानी मातेची मुर्ती एक वेगळ्या पद्धतीची आहे.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.