रावसाहेब रंगराव बोराडे
From Wikipedia, the free encyclopedia
रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आहेत.[1] इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत.
जलद तथ्य रावसाहेब रंगराव बोराडे, जन्म नाव ...
रावसाहेब रंगराव बोराडे | |
---|---|
जन्म नाव | रावसाहेब रंगराव बोराडे |
टोपणनाव | रा. रं. बोराडे |
जन्म |
डिसेंबर २५, इ.स. १९४० काटगाव, लातूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
नाटक, साहित्य, विनोद, तत्वज्ञान, ब्लॉग |
साहित्य प्रकार | कथा, कादम्बरी, नाटक, समीक्षा, ब्लॉग |
विषय | सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ग्रामीण |
चळवळ | ग्रामीण साहित्य चळवळ |
प्रसिद्ध साहित्यकृती |
पाचोळा आमदार सौभाग्यवती नाती गोती बुरूज |
वडील | रंगराव भाऊराव बोराडे |
पत्नी | सुलभा |
अपत्ये | अरुणा, कल्पना, प्रेरणा, मंजूषा |
पुरस्कार |
१.उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार(एकूण : ५ पुरस्कार) २. फाय फाउंडेशन पुरस्कार ३. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती ४. यशवंतराव चव्हाण पुरस्कार,अंबाजोगाई ५. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार ६. मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार ७. भैरूरतन दमाणी पुरस्कार ८. जयवंत दळवी पुरस्कार |
स्वाक्षरी |
बंद करा