येशू ख्रिस्त
ख्रिस्ती धर्माचे संस्थापक / From Wikipedia, the free encyclopedia
येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्या जन्मासंबंधी, तसेच त्याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्हटले जाते.
जलद तथ्य येशू ख्रिस्त, जन्म ...
येशू ख्रिस्त | |
---|---|
जन्म |
इ.स. ४ बेथलेहेम |
मृत्यू |
इ.स. ३० जेरुसलेम |
मृत्यूचे कारण | वधस्तंभ किंवा क्रूसावर चढवले |
प्रसिद्ध कामे | मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे |
मूळ गाव | नाझारेथ |
पदवी हुद्दा | परमेश्वराचा पुत्र (जगाचा तारणहार) |
वडील | जोसेफ |
आई | मारिया |
बंद करा
पहिल्या शतकातील ज्यू धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[1]