युएफा यूरो २००८
From Wikipedia, the free encyclopedia
युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७, इ.स. २००८ ते जून २९, इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.
जलद तथ्य युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८ (Fußball-Europameisterschaft 2008), स्पर्धा माहिती ...
युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद २००८ (Fußball-Europameisterschaft 2008) | |
---|---|
युएफा यूरो २००८ अधिकृत चिन्ह | |
स्पर्धा माहिती | |
यजमान देश |
ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड |
तारखा | जून ७ – जून २९ |
संघ संख्या | १६ |
स्थळ | ८ (८ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | स्पेन (2 वेळा) |
उपविजेता | जर्मनी |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३१ |
एकूण गोल | ७७ (२.४८ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ११,४०,९०२ (३६,८०३ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | डेव्हिड व्हिया (४ गोल) |
← २००४ २०१२ → | |
बंद करा