मे ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२७ वा किंवा लीप वर्षात १२८ वा दिवस असतो.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एकोणिसावे शतक
- १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे.
- १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले
- १८९५ : अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला
- १८९९ : रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी
विसावे शतक
- १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
- १९४५ : जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त - युरोप विजय दिन
- १९४६: सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली.
- १९५२ : जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली
- १९५४ - १९५५पासून सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला
- १९५५: एर इंडियाची मुंबई – तोक्यो विमानसेवा सुरू झाली.
- १९७३ : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ
- १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली.
- १९७८ : एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी
- १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले
- १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
- १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
- १९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी
- १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर ही कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे.
- १८४७ - आर्चिबाल्ड प्रिमरोझ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८६१ - रबिन्द्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक.
- १८६७ - व्लादिस्लॉ रेमॉंट, पोलिश लेखक.
- १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्न.
- १८९२ - जोसिप ब्रॉझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक.
- १९१९ - एव्हा पेरॉन, आर्जेन्टिनाची गायिका.
- १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म..
- १९३९ - रूड लुबर्स, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९५६ - यान पीटर बाल्केनेंडे, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन लँड
- १९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल
- १९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९२४: आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू
- १९८६- समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन
- १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाळ नरहर नातू यांचे पुणे येथे निधन.
- १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर
- २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर
- २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन
- २००२ - दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
- २०२० - मालविका मराठे, (१९९१-२००१ या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी प्रसारक संस्था-सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका.)
- रेडियो दिन - रशिया.
- जागतिक अस्थमा दिन
- एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस