मार्जार कुळ
From Wikipedia, the free encyclopedia
मार्जार कूळ हे घरगुती मांजर व त्या सदृश दिसणाऱ्या प्राण्यांचे जैविक कुळ आहे. या मध्ये घरगुती मांजरापासून ते वाघ सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांचाही समावेश होतो. या सर्वांचे दिसण्यातील सारखेपणा तसेच शिकारीच्या व इतर सवयी बहुतांशी घरगुती मांजराप्रमाणेच असतात. ह्यांमधील सर्वच उपजाती अत्यंत कुशल शिकारी असून सर्वजण मांसभक्षक आहेत. निसर्गात त्यांच्यापेक्षा कुशल शिकारी नसल्याने अन्नसाखळीत त्यांचे स्थान सर्वात वरचे आहे.
मार्जार कुळ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||
| ||||||||||
मार्जार कुळात दोन प्रमुख उपकुळे आहेत. एक पँथेरा ( वाघ सिंह, व बिबट्या). यामध्ये ज्या प्राण्यांना डरकाळी फोडता येते अशांचा समावेश आहे. दुसरे उपकुळ आहे फेलिने. या उपकुळात बहुतांश मार्जार कुळातील प्रजातींचा समावेश होतो. उदा: चित्ता, लिंक्स, रानमांजरी व घरगुती मांजर. मार्जार कुळाची उत्पत्ती साधारणपणे अडीच कोटी वर्षांपूर्वी ओलिगोसिन कालखंडात झाली.
मार्जार कुळातील सर्व मांजरे ही मांसभक्षक आहेत व कुठल्याही पृष्ठवंशी प्राण्याची शिकार करून खाण्यास समर्थ आहेत. सिंहाचा अपवाद वगळता सर्वच मांजरे एकटे रहाणे पसंत करतात व बहुतेक जाती निशाचर आहेत. कुठल्याही वातावरणासाठी आपल्या शरीरात योग्य ते बदल घडवून आणून जगातील कानाकोपऱ्यात त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. फक्त ऑस्ट्रेलिया व अंटार्टिकाचा तसेच खंडापासून अतिदूरची बेटे यांचा अपवाद वगळता जंगली मांजरे पृथ्वीच्या सर्व भागात आहेत.