![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/af/Countries_where_Malayalam_is_spoken.png/640px-Countries_where_Malayalam_is_spoken.png&w=640&q=50)
मल्याळम भाषा
From Wikipedia, the free encyclopedia
मल्याळम् किंवा मलयाळं/मलयालम् (मराठी नामभेद: मलयाळि भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन् लिपि: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे.[1]