![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/35/Naval_Ensign_of_India.svg/langmr-640px-Naval_Ensign_of_India.svg.png&w=640&q=50)
भारतीय नौदल
भारतीय लष्कराचा नौदल विभाग / From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना "भारतीय नौदलाचे जनक" मानले जाते.[ संदर्भ हवा ]
भारतीय नौदल | |
![]() | |
स्थापना | १९३४ |
देश | ![]() |
विभाग | नौदल |
आकार | ५६००० खलाशी |
ब्रीदवाक्य | ' शं नो वरुण ' |
रंग संगती | |
मुख्यालय | नवी दिल्ली |
सेनापती | आर हरी कुमार |
संकेतस्थळ |
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/35/Naval_Ensign_of_India.svg/640px-Naval_Ensign_of_India.svg.png)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c4/Naval_Ensign_of_India_%282001%E2%80%932004%29.svg/640px-Naval_Ensign_of_India_%282001%E2%80%932004%29.svg.png)
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/67/Naval_Ensign_of_India_%281950%E2%80%932001%29.svg/640px-Naval_Ensign_of_India_%281950%E2%80%932001%29.svg.png)
इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स. १९७१च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.