ब्रत्तान्य (ब्रेतॉन: Breizh, फ्रेंच: Bretagne, उच्चार , इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात बिस्केचा उपसागर व इंग्लिश खाडी ह्यांच्या मधील एका द्वीपकल्पावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग सध्या पेई दाला लोआर प्रदेशामधील लावार-अतलांतिक विभागात मोडतो. ऱ्हेन ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ब्रेस्त हे येथील एक प्रमुख शहर आहे.
ब्रत्तान्य Bretagne | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
ब्रत्तान्यचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | ऱ्हेन | ||
क्षेत्रफळ | २७,२०८ चौ. किमी (१०,५०५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३४,३३,१५५ | ||
घनता | १३३ /चौ. किमी (३४० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-BRE | ||
संकेतस्थळ | bretagne.bzh | ||
ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान ग्रेट ब्रिटनमधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे.
विभाग
ब्रत्तान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- कोत-द'आर्मोर (Côtes-d'Armor)
- फिनिस्तर (Finistère)
- इल-ए-व्हिलेन (Ille-et-Vilaine)
- मॉर्बियां (Morbihan)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.