From Wikipedia, the free encyclopedia
बाडेन-व्युर्टेंबर्ग हे जर्मनीचे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. ऱ्हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे नेकार नदीच्या किनारी वसलेली आहेत. (उदा: स्टुटगार्ट , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, मानहाइम ). याची राजधानी स्टुटगार्ट असून हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे.
बाडेन-व्युर्टेंबर्ग Baden-Württemberg | |||
जर्मनीचे राज्य | |||
| |||
बाडेन-व्युर्टेंबर्गचे जर्मनी देशामधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राजधानी | श्टुटगार्ट | ||
क्षेत्रफळ | ३५,७५२ चौ. किमी (१३,८०४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,०७,५५,००० | ||
घनता | ३००.८ /चौ. किमी (७७९ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | DE-BW | ||
संकेतस्थळ | baden-wuerttemberg.de | ||
बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्याच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीलगत फ्रान्सची सीमा आहे व दक्षिणेला स्वित्झर्लंडची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पूर्वेला बायर्न, तर उत्तरेला ऱ्हाइनलॅंड-फाल्त्स व हेसेन या राज्यांच्या सीमा आहेत.
राज्यातील प्रमुख नदी - ऱ्हाइन नदी - फ्रान्सच्या सीमेलगत वाहते. राज्यातील इतर प्रमुख नद्यांमध्ये नेकार व डोनाउ यांचा समावेश होतो. नेकार नदी मानहाइम या शहराजवळ ऱ्हाइन नदीला मिळते. डोनाउ नदी ही पूर्ववाहिनी असून तिचा युरोपातील प्रमुख नद्यांत समावेश होतो. ती बायर्नमधून पुढे जाऊन युरोपातील अनेक देशांतून वाहते व सरतेशेवटी रोमानियामध्ये काळ्या समुद्राला जाऊन मिळते. नेकार व डोनाउ या दोन्ही नद्या ब्लॅक फॉरेस्टनजीकच्या पर्वतरांगेत उगम पावतात.
ब्लॅक फॉरेस्ट अथवा जर्मन भाषेत श्वार्झवाल्ड ही राज्यातील प्रमुख पर्वतरांग आहे. या डोंगररांगामध्ये असलेले पाईन वृक्षांच्या घनदाट जंगलांमु़ळे याचे नाव ब्लॅक फोरेस्ट असे पडले. यामध्ये फेल्डबर्ग हे सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची १४९३ मी आहे. ब्लॅक फॉरेस्टने डोंगररांगेनी राज्याचा पश्चिम भाग व्यापला आहे तर पूर्व भागात स्वेबियन आल्प्स ( अथवा श्वाबन आल्प्स) ही डोंगररांग आहे. या दोन डोंगररांगांमुळे हे राज्य बहुतांशी उंच-सखल आहे.
दक्षिणेला स्वित्झर्लंडच्या सीमेलगत बोडेन्जी हे तळे असून जर्मनीतील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.