![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/22/Republic_of_Balochistan.jpg/640px-Republic_of_Balochistan.jpg&w=640&q=50)
बलुचिस्तान
From Wikipedia, the free encyclopedia
बलुचिस्तान हा दक्षिण पश्चिम आशियातील डोंगराळ प्रदेश आहे. यात दक्षिण पूर्व इराण, पश्चिम पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानचा समावेश होतो. या प्रदेशात बलुची नावाच्या जमाती राहतात. त्यांच्या भाषेला बलुची भाषा म्हणतात. हिंदुस्थानच्या फाळणीपूर्व बलुचिस्तानात मुळात सुमारे ५४ हजार हिंदू होते. त्यांची संख्या साडेतीन हजारावर आली. ही हिंगलाज माता, हिंगला किंवा हिंगुला देवी हे आजच्या बलुचिस्तानातले एक हिंदू देवस्थान आहे. आजही अनेक हिंदू यात्रेकरू विशेषतः मारवाडी आणि कच्छी पाकिस्तानच्या अनेक कटकटी सोसून या देवीच्या दर्शनाला जात असतात. बलुची मुसलमानही त्या देवीला भजतात. तिचा उल्लेख ते ‘बीबी नानी’ या नावाने करतात. कलात या शहरातही एक प्रख्यात असे कालीमातेचे स्थान आजही आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख बलुचिस्तान नावाचा भौगोलिक प्रदेश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बलुचिस्तान (निःसंदिग्धीकरण).