फोक्सवागन
जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी / From Wikipedia, the free encyclopedia
फोक्सवागन ही जर्मनीतील वाहन उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यलय वोल्फ्सबुर्ग (लोअर सॅक्सनी राज्यात) असून कंपनीची स्थापना १९३७ साली झाली. फाउ-वे (VW) या संक्षिप्तनामानेही कंपनीची ओळख आहे. [1]. फोक्सवागनच्या कंपनी समूहात अनेक वाहन उत्पादक आहेत व त्यातील काही वाहन उत्पादनात अतिशय प्रसिद्ध आहेत. ऑडी, बेंटले मोटर्स, बुगाटी ऑटोमोबाईल्स, फियाट, स्कोडा ऑटो, पोर्शे व अवजड वाहने बनवणारे स्कानिया ही उत्पादके फोल्क्सवागन उत्पादन समूहात मोडतात. फोक्सवागन या शब्दाचा अर्थ जनसामान्यांचे 'दास ऑटो' हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये फोक्सवागन व पोर्शे या वाहन उत्पादक समूहाने टोयोटाची वाहन उत्पादकांमधील मक्तेदारी मोडून काढून सध्याचा सर्वाधिक वाहन विक्रेता समूह म्हणून नावाजला आहे.[2] एकविसाव्या शतकात फोक्सवागनने भारतातही पाऊल रोवले असून वाहनांच्या विक्रिला प्रारंभ केला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |