पेरू
दक्षिण अमेरिका खंडातील एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
पेरूचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Perú, उच्चार ) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.
- पेरु ह्या फळासाठी पहा: पेरु (फळ)
पेरू República del Perú पेरूचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: सोमोस लिब्रेस, सेआमोस्लो सीएंप्रे ('आपण स्वतंत्र आहोत, नेहमीच राहू') | |||||
पेरूचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
लिमा | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
इतर प्रमुख भाषा | किशुआ, आयमारा | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | ॲलन गार्शिया | ||||
- पंतप्रधान | होर्हे देल कास्तियो | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्वातंत्र्य | स्पेनपासून | ||||
- घोषणा | २८ जुलै १८२१ | ||||
- संयुक्तीकरण | ९ डिसेंबर १८२४ | ||||
- मान्यता | १४ ऑगस्ट १८७९ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १२,८५,२१६ किमी२ (२०वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.४१ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | २,९४,९६,००० (४०वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | २३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २९९.६५ अब्ज[1] अमेरिकन डॉलर (४९वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ९,९८५ अमेरिकन डॉलर (९५वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲०.७२३[2] (उच्च) (६३ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | नुएव्हो सोल (PEN) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी-५ | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | PE | ||||
आंतरजाल प्रत्यय | .pe | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५१ | ||||
प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक [[आदिवासी]] वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते. १६व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर [[दक्षिण अमेरिकन]] प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली. १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, [[खाणकाम]] इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.