पोंतियानाक
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते.
पोंतियानाक | |||
---|---|---|---|
शहर | |||
कोटा पोंतियानाक | |||
| |||
Nickname(s): कोटा खातुलिस्तिवा (विषुववृत्तीय शहर) | |||
Motto(s): पोंतियानाक बेर्सिनार (तेजस्वी पोंतियानाक) | |||
गुणक: 00°01′14″S 109°20′29″E | |||
देश | साचा:INA | ||
प्रदेश | कालीमंतान | ||
प्रांत | West Kalimantan | ||
पोंतियानाकच्या सुलतानाने केलेली स्थापना | २३ ऑकटोबर, १७७१ | ||
डच लोकांची वसाहत | ५ जुलै, १७७९ | ||
नगरपालिकेची स्थापना | १९५३ | ||
सरकार | |||
• प्रकार | नगरपालिक | ||
• महापौर | एदी रुस्दी कामतोनो | ||
क्षेत्रफळ | |||
• शहर | ११८.३२ km२ (४५.६८ sq mi) | ||
Elevation | १ m (३ ft) | ||
Lowest elevation | ०.८ m (२.६ ft) | ||
लोकसंख्या (२०२२चा अंदाज) | |||
• शहर | ६६९७९५ | ||
[1] | |||
एरिया कोड | (+६२) ५६१ | ||
वाहन नोंदणी | KB | ||
संकेतस्थळ |
pontianakkota |
हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [2] [3] २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती. [1]
पोंतियानाकची स्थापना कपुआस नदीच्या मुखावर एक लहान मलय मासेमारी गाव म्हणून झाली. त्यानंतर अनेक शतके ते पोंतियानाक सल्तनतची राजथानी होते. पोंतियानाक सल्तनत आणि डच सरकार यांच्यातील तहाद्वारे पोंतियानाकचा डच ईस्ट इंडीजमध्ये समावेश करण्यात आला. वसाहतकाळातत, पोंतियानाक हे डच ईस्ट इंडीजच्या सरकारी मुख्यालयांपैकी एक होते.
कालांतराने जपानने डच ईस्ट इंडीजवर काबीज केले तेव्हा त्यांनी येथील सुलतानासह अनेक मलय सरदार, अधिकारी आणि असंख्य इतर लोकांना कापून काढले. जपानच्या शाही आरमाराने मंडोरच्या नरसंहारासह अनेक ठिकाणी हे हत्याकांड चालवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानने शरणागती पत्करल्यावर पोंतियानाक इंडोनेशिया प्रजासत्ताकच्या पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी झाले
पोंतियानाकची बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम (६३.४%) असून उर्वरित बौद्ध (२३.२%), कॅथोलिक (९.१%), प्रोटेस्टंट (३.२%), कन्फ्यूशियन (१.२%), हिंदू (०.१%) आणि इतर (०.१%) आहेत. [4] बहुसंख्य मुस्लिम हे मलय, जावानीज, मदुरीज इ. आहेत. बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशियन धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक चिनी इंडोनेशियन आहेत, तर बरेच चीनी देखील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. दयाक लोक कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट धर्माचे तसेच स्थानिक प्राचीन धर्माचेही पालन करतात. काही दयाक स्थानिक लोक धर्म कहरिंगनचे देखील पालन करतात. तथापि, इंडोनेशियन सरकार कहारिंगनला धर्म म्हणून मान्यता देत नाही आणि म्हणून कहरिंगन लोकांचे वर्गीकरण हिंदू असे होते.
सुपादिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोंतियानाक आणि पश्चिम कालीमंतानचा मुख्य विमानतळ आहे. याची बांधणी जे दुसऱ्या महायुद्धात जपानने केली. हा विमानतळशहरापासून १७ किमी अंतरावर कुबू राया भागात आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.