पवित्र रोमन सम्राट
From Wikipedia, the free encyclopedia
पवित्र रोमन साम्राज्याच्या राज्यकर्त्यांना पवित्र रोमन सम्राट (जर्मन: Römisch-Deutscher Kaiser, रोमिश-दॉइचेर कैसर; रोमन-जर्मन सम्राट) ही पदवी असे.
या साम्राज्यात आत्ताच्या जर्मनीचा बराचसा भाग, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रिया, लिच्टेन्स्टेन, स्लोव्हेनिया, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, पोलंडचा बराचसा भाग व नेदरलँड्सचा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात स्वित्झरलंड, सगळे नेदरलँड्स आणि फ्रांस व इटलीचेही काही भाग समाविष्ट होते.