भारताचे परराष्ट्रमंत्री
From Wikipedia, the free encyclopedia
भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.
जलद तथ्य भारताचे परराष्ट्रमंत्री Minister of External Affairs, नियुक्ती कर्ता ...
भारताचे परराष्ट्रमंत्री
Minister of External Affairs | |
---|---|
परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार | |
नियुक्ती कर्ता | राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार) |
निर्मिती | २ सप्टेंबर १९४६ |
पहिले पदधारक | जवाहरलाल नेहरू |
संकेतस्थळ | परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ |
बंद करा
परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.