![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7b/Novak_%25C4%2590okovi%25C4%2587_%252814948451900%2529.jpg/640px-Novak_%25C4%2590okovi%25C4%2587_%252814948451900%2529.jpg&w=640&q=50)
नोव्हाक जोकोविच
From Wikipedia, the free encyclopedia
नोव्हाक जोकोविच (सर्बियन: Новак Ђоковић, Novak Đoković;) (२२ मे, इ.स. १९८७; बेलग्रेड, युगोस्लाव्हिया - हयात) हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोल व जोकर ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६, २०१९, २०२० व २०२१ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९ साली विंबल्डन व २०११, २०१५ व २०१८ साली यू.एस. ओपन आणि २०१६ व २०२१ साली (फ्रेंच ओपन) ह्या १९ ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिस खेळाडू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.
![]() २०१४ रोम मास्टर्स दरम्यान | |
देश |
![]() |
---|---|
वास्तव्य | मोनॅको |
जन्म |
२२ मे, १९८७ (1987-05-22) (वय: ३७) बेलग्रेड, सर्बिया (तत्कालीन युगोस्लाव्हिया) |
उंची | १.८८ मी (६ फु २ इं) |
सुरुवात | इ.स. २००३ |
शैली | उजव्या हाताने; बॅकहॅंड दोन्ही हातांनी |
बक्षिस मिळकत | १४९ दशलक्ष अमेरिकन डॉलर |
प्रदर्शन | 1105–219 |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | पहिला (४ जुलै २०११) |
क्रमवारीमधील सद्य स्थान | पहिला (१४ जून २०२१) |
ऑस्ट्रेलियन ओपन | विजयी (२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५,२०१६, २०१९, २०२०, २०२१) |
फ्रेंच ओपन | विजयी (२०१६, २०२१) |
विंबल्डन | विजयी (२०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९) |
यू.एस. ओपन | विजयी (२०११, २०१५, २०१८) |
टूर फायनल्स | ५ |
प्रदर्शन | ३१ - ४४ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | ११४ (३० नोव्हेंबर, इ.स. २००९) |
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१५. |
ऑलिंपिक पदक माहिती | |||
![]() | |||
---|---|---|---|
टेनिस - पुरुष | |||
कांस्य | २००८ बीजिंग | एकेरी |
२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिस खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिस खेळाडू रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.
सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिस खेळाडूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.
जोकोविच आपल्या तडाखेबाज खेळासोबत खेळकर स्वभावासाठी देखील लोकप्रिय आहे. इतर टेनिस खेळाडूंच्या नकला करणे तसेच सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यानंतर टिवल्याबावल्या करणे इत्यादी विनोदी उद्योगात तो पारंगत आहे.