नेव्हाडा
From Wikipedia, the free encyclopedia
नेव्हाडा (इंग्लिश: Nevada, नेव्हॅडा ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.
नेव्हाडा Nevada | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | कार्सन सिटी | ||||||||||
मोठे शहर | लास व्हेगास | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,८६,३६७ किमी² | ||||||||||
- रुंदी | ५१९ किमी | ||||||||||
- लांबी | ७८८ किमी | ||||||||||
- % पाणी | २.४ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३५वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २७,००,५५१ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ९/किमी² (अमेरिकेत ४२वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ३१ ऑक्टोबर १८६४ (३६वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-NV | ||||||||||
संकेतस्थळ | www.nv.gov | ||||||||||
नेव्हाडाच्या पश्चिमेला कॅलिफोर्निया, पूर्वेला युटा, आग्नेयेला अॅरिझोना तर उत्तरेला ओरेगन व आयडाहो ही राज्ये आहेत. कार्सन सिटी ही नेव्हाडाची राजधानी तर लास व्हेगास हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.
नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या अमेरिकन गृहयुद्धात उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर बॅटल बॉर्न (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. लास व्हेगास येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. वेश्याव्यवसायाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.
गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.