नागालँड
भारतातील एक राज्य. / From Wikipedia, the free encyclopedia
नागालॅंड उच्चार (सहाय्य·माहिती) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ १६,५७९ चौ.किमी असून लोकसंख्या १९,८०,६०२ एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता ८०.११ टक्के एवढी आहे.
जलद तथ्य
?नागालँड भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १६,५७९ चौ. किमी |
राजधानी | कोहिमा |
मोठे शहर | दीमापुर |
जिल्हे | ८ |
लोकसंख्या • घनता |
१९,८८,६३६ (24th) • १२०/किमी२ |
भाषा | इंग्रजी |
राज्यपाल | निखिल कुमार |
मुख्यमंत्री | नैफीउ रीयो |
स्थापित | १ डिसेंबर इ.स. १९६३ |
विधानसभा (जागा) | नागालँड विधानसभा (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-NL |
संकेतस्थळ: Nagaland.nic.in | |
नागालँड चिन्ह |
बंद करा