![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/59/Nile-en.svg/langmr-640px-Nile-en.svg.png&w=640&q=50)
नाईल नदी
अफ्रिकेतील व जगातील सर्वात लांब नदी / From Wikipedia, the free encyclopedia
नाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[1] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/59/Nile-en.svg/320px-Nile-en.svg.png)
नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया,
इजिप्त,
सुदान,
युगांडा,
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व
टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.