या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करून लिहिल्या जातात. त्यामुळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. द्विमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किंमत २ च्या पटीत वाढते. ११०१० या द्विमान संख्येची फोड : १*१६+१*८+०*४+१*२+०*१ = २६ (दशमान) अशी होते. अशाप्रकारे द्विमानातल्या कोणत्याही संख्येचे दशमानात रूपांतर करणे सोपे आहे. १००११० या द्विमान संख्येचे रूपांतर १*२ + ०*२ + ०*२ + १*२ + १*२ + ०*२
= ३२ + ४ + २ = ३८ (दशमान) असे होते.


दशमान व द्विमान पद्धतीतील अंक
दशमान पद्धतद्विमान पद्धत
१०
११
१००
१०१
१०००
१६१००००
५०११००१०

हे सुद्धा पहा

पंचमान पद्धत दशमान पद्धत रोमन पद्धत

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.