From Wikipedia, the free encyclopedia
भारतात हिंदूंचे हत्याकांड अत्यंत पद्धतशीर पणे केले गेले आहे अनेक इस्लामी बखरींमध्ये याची नोंद ठेवली गेलेली दिसून येते यालाच दस्तावेजीकरण केलेले हिंदू हत्याकांड म्हणतात. भारतात सुमारे आठ कोटी (८० दशलक्षाहून अधिक) हिंदूंची निर्दयीपणे हत्या करण्यात आली.[1] इस्लामिक शासक आणि सुलतान यांच्या कडून कोट्यवधींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आणि कोट्यवधी हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि त्यांना आयुष्यभरासाठी लैंगिक गुलाम बनवण्यात आले. आणि हे अत्याचार फारसे, तुर्की आणि इतर अभारतीय भाषांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. भारतावर झालेल्या इस्लामी आक्रमणात अनेक ऐतिहासिक कागदपत्रात हिंदू हत्याकांडांचे गौरवीकरण केलेले दिसून येते. प्रत्येक लढाई आणि आक्रमणादरम्यात किती हिंदू मारले गेले याची वर्णने अल्लाउद्दीन खिल्जि ते औरंगजेबापर्यंत लिखित स्वरूपात आढळून येतात. हिंदूंचा छळ अनेक शतके त्यांच्याच जमिनीवर होत राहिलेला आढळून येतो. गोवा इन्क्विझिशन दरम्यान चर्च ने ऐतिहासिक कागदपत्रात याची नोंद ठेवलेली दिसून येते.[2] नादिरशहाने एकट्या दिल्लीत मारलेल्या हिंदूंच्या कवटीचा डोंगर बनवला. हिंदूंचा नरसंहार किमान १००० वर्षे चालू राहिला.[3] आणि आजही पाकिस्तान मध्ये चालूच असलेला दिसून येतो.
अमीर खुसरोच्या लिखित बखरीनुसार इ.स १३०३ मध्ये अलाउद्दीन खल्जीने चितोडला वेढा घालून ३०,००० तीस हजार हिंदूंची कत्तल करण्याचा आदेश दिला आणि हे हत्याकांड घडवून आणले.[4] अर्थात राजपूत हिंदूंनी याला प्राणपणाने विरोध केला होता. अकबर या मुस्लिम शासकाने गारहा-कटंगा राज्य (आताचा नरसिंगपूर जिल्हा) येथील हिंदूंची हत्या करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची प्रत उपलब्ध आहे. याची अंमल बजावणी होऊन ४०००० चाळीस हजार हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. येथिल शूर हिंदू शेवट पर्यंत झुंजत राहिले होते. पण संखेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या प्रसंगी आक्रमक मुस्लिम सैन्याने हिंदूंची मुंडकी झाडा-झाडांवर टांगली गेली होती आणि भाल्या टोकांवर मिरवली गेली होती व मानवतेला काळिमा फसला होता.[5] अकबराने चित्तोडमध्ये ३००००० तीस हजार सामान्य हिंदूंच्या लोकांच्या हत्याकांडाचे आदेश दिले आणि अनेकांना कैदी करून गुलाम म्हणून घेतले.[6] तैमूर लंग या क्रूर मुस्लिम् आक्रमकांने एक लाख हिंदूंची कत्तल केल्याचा आदेश आणि उल्लेख लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. दिल्लीची लढाई सुरू होण्यापूर्वी, त्याच्या लक्षात आले की त्याच्याकडे पकडलेल्या हिंदू गुलामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एवढ्या मोठ्या गटाला नियंत्रणात ठेवणे अवघड होत चालले होते. अनेक हिंदू उठाव करू लागले होते आणि आक्रमण उलटले जाऊ लागले होते. लढणे अवघड आणि धोकादायक दोन्ही होते म्हणून दिल्लीवर हल्ला करण्यापूर्वी बंड टाळण्यासाठी पकडलेल्या एक लाख हिंदू गुलामांना मारण्याचा आदेश त्याच्या सैनिकांना दिला होता.[7] ११९७ मध्ये, बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा नाश केला, त्यातील सर्व भिक्षूंची कत्तल केली.[8]टिपू सुलतानने त्रावणकोरविरुद्धच्या युद्धात दहा हजार हिंदू ठार मारले. बहमनी सुलतानांचा दरवर्षी किमान एक लाख हिंदूंना मारण्याचा वार्षिक अंदाज आहे. इस्लामने भारताचे किती नुकसान केले याचे संशोधन अजून योग्य पद्धतीने सुरू झालेले नाही.[9]
मानगड हत्याकांडात सुमारे १५०० हिंदू आदिवासी समाजाचे लोक मारले गेले. ब्रिटिश अधिकारी मेजर एस. बेली आणि कॅप्टन ई. स्टोईली यांच्या नेतृत्वाखाली मशीन गन आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. आरई हॅमिल्टन या स्थानिक राजकीय प्रतिनिधीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.[10]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.