आग्नेय आशिया
आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश / From Wikipedia, the free encyclopedia
आग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला हिंदी महासागर व पूर्वेला प्रशांत महासागर आहेत.
आग्नेय आशिया | |
---|---|
क्षेत्रफळ | ५०,००,००० चौ. किमी (१९,००,००० चौ. मैल) |
लोकसंख्या | ५९.३ कोटी |
घनता | ११८.६ /चौ. किमी (३०७ /चौ. मैल) |
देश | |
भूभाग |
४+२
|
जीडीपी (२००९) | $१.४८६ अब्ज |
दरडोई उत्पन्न (२००९) | $२,५०० |
राजधानीची शहरे |
भौगोलिक दृष्ट्या कधीकधी हाँग काँग, मकाओ व तैवान देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व आसियान हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. भारताच्या अंदमान आणि निकोबार व ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे.
संपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा भूकंपप्रवण व जागृत ज्वालामुखी क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, त्सुनामी इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले.