![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/de/Trent_Bridge_MMB_01_England_vs_New_Zealand.jpg/640px-Trent_Bridge_MMB_01_England_vs_New_Zealand.jpg&w=640&q=50)
ट्रेंट ब्रिज मैदान (नॉटिंगहॅम)
From Wikipedia, the free encyclopedia
ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत.
२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे.
जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
![]() | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | नॉटिंगहॅम, इंग्लंड |
स्थापना | १८३० |
आसनक्षमता | १७,५०० |
यजमान | नॉट्टींघमशायर |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
१-३ जून १८९९:![]() ![]() |
अंतिम क.सा. |
१८-२२ ऑगस्ट २०१८: ![]() ![]() |
प्रथम ए.सा. |
३१ ऑगस्ट १९७४: ![]() ![]() |
अंतिम ए.सा. |
६ जून २०१९: ![]() ![]() |
प्रथम २०-२० |
६ जून २००९: ![]() ![]() |
अंतिम २०-२० |
२४ जून २०१२: ![]() ![]() |
यजमान संघ माहिती | |
नॉट्टींघमशायर (१८४० – सद्य) | |
शेवटचा बदल १३ जून २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
बंद करा