![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bf/Zee_Marathi_Official_Logo.jpg/640px-Zee_Marathi_Official_Logo.jpg&w=640&q=50)
झी मराठी
भारतीय दूरचित्रवाणी / From Wikipedia, the free encyclopedia
झी मराठी ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी अल्फा टीव्ही मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवले जातात. झी मराठी एचडी वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. महिन्याच्या रविवारी झी मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.
जलद तथ्य झी मराठी, सुरुवात ...
झी मराठी | |
---|---|
![]() | |
![]() | |
सुरुवात | १५ ऑगस्ट १९९९ |
मालक | झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस |
ब्रीदवाक्य | मी मराठी, झी मराठी |
देश | भारत |
मुख्यालय | १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१८ |
जुने नाव | अल्फा टीव्ही मराठी |
भगिनी वाहिनी | झी युवा, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर |
प्रसारण वेळ | संध्या. ६ ते रात्री ११ (प्राइम टाइम) |
संकेतस्थळ | http://www.zeemarathi.com |
बंद करा