जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.

जलद तथ्य
जपानी साम्राज्य
दाइ निप्पॉन तेइकोकु
大日本帝國

इ.स. १८६८इ.स. १९४७
Thumbध्वज Thumbचिन्ह
Thumb
ब्रीदवाक्य: 八紘一宇
हाक्को इचीउ
(सर्व जग एका छत्राखाली!)
राजधानी तोक्यो
राष्ट्रप्रमुख मैजी (इ.स. १८६८ - इ.स. १९१२)
तैशो (इ.स. १९१२ - इ.स. १९२६)
हिरोहितो - (इ.स. १९२६ - इ.स. १९४७)
पंतप्रधान हिरोबुमी इतो (इ.स. १८८५-८८, इ.स. १८९२-९६, इ.स. १८९८, इ.स. १९००-०१)
फुमिमारो कोनोये (इ.स. १९३७-३९, इ.स. १९४०-४१)
हिदेकी तोजो (इ.स. १९४१-४४)
शिगेरू योशिदा (इ.स. १९४६-४७)
धर्म बौद्ध
राष्ट्रीय चलन जपानी येन
आजच्या देशांचे भाग जपान ध्वज जपान
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया
रशिया ध्वज रशिया
Flag of the People's Republic of China चीन
Flag of the Republic of China तैवान (तैवान)
बंद करा

जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व उद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.

जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.

युद्धे

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा
  • "जपानने पराभव स्वीकारल्याचे मूळ शरणपत्र" (इंग्लिश भाषेत). 2008-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.