छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबईतील एक ऐतिहासिक रेल्वे स्थानक / From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले. येथे १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत. फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
जलद तथ्य स्थानक तपशील, पत्ता ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छ.शि.म.ट. मध्य रेल्वे टर्मिनस मुंबई उपनगरी रेल्वे टर्मिनस | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग (हॉर्नबी रोड) मुंबई |
गुणक | 18.94°N 72.8353°E / 18.94; 72.8353 |
मार्ग | मध्य, हार्बर |
फलाट | १८ |
इतर माहिती | |
उद्घाटन | मे १८८८ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | CSMT, ST |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
बंद करा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: – |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: मशीद | |
स्थानक क्रमांक: १ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ० कि.मी. |
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: – |
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: मशीद | |
स्थानक क्रमांक: १ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ० कि.मी. |