कालांतराने अर्थव्यवस्थेत किंमत पातळीत वाढ From Wikipedia, the free encyclopedia
महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.
ज्ञात इतिहासात सुमारे इ.स १९२० पर्यंत बहुतेक देशांत चलनाचा पुरवठा हा देशातील सोन्याच्या साठ्याशी निगडित असत असे. सोने तारण म्हणून ठेवले जाई व त्यानुसार किमती स्थिर राहत असत. त्या काळात भाववाढीची समस्या तीव्रतेने भासत नसे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याशी असलेला चलनाचा संबंध सुटला. या काळातील विचारानुसार उत्पादन वाढले की रोजगार वाढतो. परिणामी मागणी वाढते. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळते. म्हणून उत्पादनवाढीचा प्रयत्न सातत्याने हवा असा विचार सरकारचा असे.
चलनवाढीची मुख्य कारणे
१) मागणी ताणजन्य चलनवाढ
२) खर्चदाबजन्य चलनवाढ
या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.