![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a8/Chandrashekar_azad.jpg/640px-Chandrashekar_azad.jpg&w=640&q=50)
चंद्रशेखर आझाद
भारतीय स्वातंत्र्य सेनानी / From Wikipedia, the free encyclopedia
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जन्म : भावरा-अलिराजपूर, २३ जुलै १९०६; - प्रयागराज, २७ फेब्रुवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
चंद्रशेखर आझाद (रावण) याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य चंद्रशेखर आझाद, जन्म: ...
चंद्रशेखर आझाद | |
---|---|
![]() प्रयागराज मधील चंद्रशेखर आझादांचा पुतळा | |
जन्म: | जुलै २३, १९०६ भाबरा, झाबुआ तालुका,झाबुआ जिल्हा, मध्यप्रदेश |
मृत्यू: | फेब्रुवारी २७, १९३१ प्रयागराज |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा |
धर्म: | हिंदू |
वडील: | पंडित सिताराम तिवारी |
आई: | जगरानी देवी |
बंद करा