किलोग्रॅम हे वजनाचे एकक आहे. एका किलोग्रॅमचे एक हजार ग्रॅम होतात. याचे एस. आय. संक्षिप्त नाम kg आहे.

जलद तथ्य किलोग्रॅम, एकक पद्धती ...
किलोग्रॅम
Thumb
घरगुती योग्यतेचे १ किलोग्रॅम लोखंडी वजन.
एकक पद्धती एस.आय. एकक
चे एकक वस्तुमान
चिन्ह kg
१ kg हे ...... याच्या समतुल्य आहे ...
   Avoirdupois    २.२०५ पाउंड
   नैसर्गिक एकके    ४.५९×10 प्लॅंक वस्तुमान
१.३५६९२०८(६०)×10५० हर्ट्‌झ[Note 1]
बंद करा
Thumb
फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा (एका किलोग्रॅमचे मूळ एकक)

मोजण्याच्या पद्धती

जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, ब्रिटिशांनी त्यांचे साम्राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी. एस. (फूट-पाउंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची आंतराराष्ट्रीय मापन पद्धत (फ्रेंच: Système international d'unités) लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी पद्धत वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये ॲंपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)

या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीसाठी, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून (आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..1

बाह्य दुवे


टीपा

  1. ज्या फोटॉन्सच्या वारंवारतेची बेरीज इतकी आहे की त्यांच्याजवळील ऊर्जा ही स्थिर स्थितीला असलेल्या एक किलोग्रॅम वस्तुमानाकडे असलेल्या ऊर्जेच्या बरोबर असते.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.