ग्रँड स्लॅम (टेनिस)
From Wikipedia, the free encyclopedia
ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते.
ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे.