क्रिकेट विश्वचषक, २००७
From Wikipedia, the free encyclopedia
इ.स. २००७ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा मार्च १३ ते एप्रिल २८, २००७ च्या दरम्यान वेस्ट ईंडीझमध्ये झाली. सोळा देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होते. आठ देशात होणाऱ्या या सामन्यांच्या मैदानांवर अंदाजे ३०,१०,००,००० (तीस कोटी दहा लाख अमेरिकन डॉलर) खर्च करण्यात आले. स्पर्धेचे अधिकृत गान द गेम ऑफ लव्ह अँड युनिटी, हे जमैकाच्या शॅगी, बार्बाडोसच्या रुपी व त्रिनिदादच्या फेय-ऍन ल्यॉन्सने रचले. नारंगी रंगाचा रॅकून प्राणी स्पर्धेचे प्रतीकहोता. याचे नाव मेलो असे आहे. स्पर्धेचा उदघाटन सोहळा जमैकातील ट्रिलॉनी शहरातील ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये मार्च ११ रोजी झाला.
क्रिकेट विश्वचषक, २००७ |
---|
अकरा एकदिवसीय सामने खेळणारे व पाच अन्य अशा सोळा देशांनी प्रत्येकी चार देशांच्या अशा चार गटातून सुरुवात केली. ही विभागणी प्रत्येक देशाच्या दोन वर्षांपूर्वीच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकानुसार करण्यात आली होती. हे गट एकाच देशात आपले सामने खेळत आहेत. प्रत्येक गटातील दोन सर्वोत्तम संघांना सुपर एट फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीतील आठपैकी ऑस्ट्रेलिया,
न्यू झीलँड,
श्रीलंका व
दक्षिण आफ्रिका हे चार सर्वोत्तम संघ उपांत्य सामन्यांत लढले. अंतिम सामना श्रीलंका व ऑस्ट्रेलियामध्ये झाला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव करीत सलग तिसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला व जागतिक क्रिकेटमधले आपले वर्चस्व पुनः एकदा सिद्ध केले.