कोरियन द्वीपकल्प
From Wikipedia, the free encyclopedia
कोरियन द्वीपकल्प हा पूर्व आशियातील एक द्वीपकल्प आहे. आशिया खंडाच्या मुख्य भूमीपासून प्रशांत महासागरात १,१०० कि.मी. लांबीपर्यंत शिरलेला हा द्वीपकल्प पूर्वेस जपानाचा समुद्र, दक्षिणेस पूर्व चीन समुद्र, पश्चिमेस पिवळा समुद्र यांनी वेढला गेला आहे. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे दोन्ही देश या द्वीपकल्पावर वसले आहेत.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d0/Korean_Peninsula.jpg/250px-Korean_Peninsula.jpg)