कोइंबतूर
भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर / From Wikipedia, the free encyclopedia
कोइंबतूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील चेन्नई खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व कोइंबतूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कोइंबतूर शहर तमिळनाडूच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा भाग असलेल्या अनामलाई व निलगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे. पालक्काड खिंड कोइंबतूर व तमिळनाडूला केरळ राज्यासोबत जोडते. कोइंबतूर शहर चेन्नईपासून ५०० किमी, बंगळूरपासून ३१० किमी तर पालक्काडपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे. उटी हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे पर्यटनस्थळ कोइंबतूरपासून ८५ किमी अंतरावर आहे. २०११ साली कोइंबतूरची लोकसंख्या १०.५ लाख होती.
कोइंबतूर கோயம்புத்தூர் |
|
भारतामधील शहर | |
गुणक: 11°00′00″N 76°58′00″E |
|
देश | भारत |
राज्य | तमिळनाडू |
जिल्हा | कोइंबतूर जिल्हा |
क्षेत्रफळ | २४६.७५ चौ. किमी (९५.२७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,३४९ फूट (४११ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १०,५०,७२१ |
- महानगर | २१,३६,९१६ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
अधिकृत संकेतस्थळ |
येथील कापूस उत्पादनामुळे व मोठ्या प्रमाणावरील वस्त्रउद्योग कारखान्यांमुळे कोइंबतूरला दक्षिण आशियाचे मॅंचेस्टर असे संबोधले जात असे. स्वातंत्र्यानंतर कोइंबतूरचे झपाट्याने उद्योगीकरण झाले व सध्या ते भारतामधील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक मानण्यात येते.