![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/69/Hitopadesha.jpg/640px-Hitopadesha.jpg&w=640&q=50)
कुरुक्षेत्र
भारतातील हरियाणामधील शहर आणि ठिकाण जिथे कृष्णाने अर्जुनला भगवद्गीता सांगितली / From Wikipedia, the free encyclopedia
कुरुक्षेत्र हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक ऐतिहासिक शहर व कुरुक्षेत्र जिल्ह्याचे मुख्यालय आहे. आहे. ह्याला धर्मक्षेत्र असेही संबोधले जाते. कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.
कुरुक्षेत्र | |
भारतामधील शहर | |
![]() |
|
गुणक: 29°58′N 76°51′E |
|
देश | ![]() |
राज्य | हरियाणा |
जिल्हा | कुरुक्षेत्र |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे. राष्ट्रीय महामार्ग १ कुरुक्षेत्रमधूनच जातो.