दोर आणि वेणी बनवण्याची पारंपारिक जपानी कलाकृती From Wikipedia, the free encyclopedia
कुमिहिमो (組み紐) ही वेणी आणि दोरी बनवण्याची पारंपारिक जपानी कला आहे.[1] याचा शब्दशः अर्थ "एकत्रित धागे" असा होतो. कुमिहिमो हे धागे, सामान्यत: रेशीम, पारंपारिकरित्या, विशेष यंत्रमाग वापरून एकमेकात गुंफुन बनवले जाते. विशेष यंत्रमागांची नावे मरुडाई (丸台) ("गोल स्टँड") किंवा टाकडाई (高台) (कोडाई म्हणूनही ओळखले जाते) अशी आहेत.
कुमिहिमो विणण्याच्या विविध शैली आहेत. या शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेणीची दोरी तयार केली जाते. अगदी सपाट वेणीपासून ते जवळजवळ संपूर्ण गोलाकार वेणी बनवल्या जातात. कुमिहिमोचा वापर ओबिजीम म्हणून केला जातो, हा किमोनो परिधान करताना पुढच्या बाजूस पट्ट्यासारखा वापरला जातो.
कुमिहिमो वेणी प्रथम वेगवेगळ्या धाग्यांना एकत्र करून फिंगरलूप वेणी तयार केल्या गेल्या. नंतर, मारुडाई आणि टाकडाई सारखी साधने विकसित केली गेली, ज्यामुळे अधिक जटिल वेण्या कमी वेळात विणल्या जाऊ शकत होत्या.
सध्याच्या काळात, कुमिहिमो विणकामाची चकती अस्तित्वात आहेत. या चकत्यांमध्ये सामान्यत: ३२ खाचा असतात. या वापरून घनदाट आणि घट्ट कुमिहिमो विणता येतात. या चकत्या पारंपारिक मारुडाईसाठी अधिक स्वस्त आणि पोर्टेबल पर्याय आहेत. या चकत्या खरेदीसाठी विविध आकारात उपलब्ध आहेत.
तथापी या आधुनिक फोम कुमिहिमो चकत्या कमी लवचिक मानल्या जातात. यात विणकरास ३२ पेक्षा अधिक धागे वापरत येत नाहीत. तसेच त्या धाग्यांची जाडी खाचेच्या रुंदीने बांधिल असते. मरुडाई मुळे विणकारास वेगवेगळ्या प्रकारच्या कुमिहिमो वेण्या विणता येतात, उदा सपाट, चौकोनी किंवा पोकळ. आधुनिक फोम कुमिहिमो चकत्या विणकराला सपाट वेण्या तयार करण्यास मदत करतात.
कुमिहिमो सर्वात प्रमुख ऐतिहासिक वापर समुराई द्वारे केला गेला.[2] त्यांच्या लॅमेलर चिलखत आणि त्यांच्या घोड्यांचे चिलखत (बार्डिंग) बांधण्यासाठी याचा वापर झाला होता. सध्या कुमिहिमोचा वापर हाओरी जॅकेटस् आणि किमोनो परिधान करताना होतो. तसेच दोरखंड बनवण्यासाठीही याचा वापर होतो.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.