कांचनगंगा (नेपाळी: कञ्चनजङ्घा) हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात असून भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. याचे खरे स्थानिक लिम्बू भाषेतील नाव सेवालुंग्मा असे असून त्याचा अर्थ ज्याला आम्ही शुभेच्छा देतो असा पर्वत असा होतो. किरन्त धर्मामध्ये सेवालुंग्मा म्हणजे धार्मिक असे समजले जाते.
कांचनगंगा | |
---|---|
चौदा फेरी, सिक्कीममधून कांचनगंगा | |
कांचनगंगा शिखराचे भारत-नेपाळ सीमेजवळील स्थान | |
२८,१६९ फूट (८,५८६ मीटर) | |
३ | |
लिंबूवन, नेपाळ सिक्कीम, भारत | |
हिमालय | |
27°42′09″N 88°08′54″E | |
२५ मे १९५५ जो ब्राउन जॉर्ज बॅंड | |
साउथ कोल |
भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय. नेपाळ व भारतातील सिक्कीम राज्यालगतच्या सीमेवर हे शिखर वसलेले आहे. १९५५ साली ज्यो ब्राउन व जॉर्ज ब्रॅंड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी ‘माउंट कांचनगंगा’वर सर्वात पहिली यशस्वी चढाई केली.
कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला मानांकित ठरला आहे.
कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत.
शिखराचे नाव | उंची मीटरमध्ये | फूट |
---|---|---|
कांचनगंगा | ८,५८६ | २८,१६९ |
कांचनगंगा पश्चिम Yalung Kang | ८,५०५ | २७,९०४ |
कांचनगंगा मध्य | ८,४८२ | २७,८२८ |
कांचनगंगा दक्षिण | ८,४९४ | २७,८६७ |
कांगबाचेन | ७,९०३ | २५,९२५ |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.