इन्सेप्शन
From Wikipedia, the free encyclopedia
इन्सेप्शन हा इ.स. २०१० वर्षाचा लियोनार्डो डिकॅप्रियोची प्रमुख भूमिका असलेला एक काल्पनिक विज्ञान साहित्यप्रकारचा इंग्लजी चित्रपट आहे. हा चित्रपट क्रिस्टोफर नोलन यांनी लिखित आणि दिग्दर्शित केला आहे, ज्याने त्यांची बायको एम्मा थॉमस यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो हा एक व्यावसायिक चोर आहे जो आपल्या ध्येयायांच्या अवचेतनात शिरून माहिती चोरतो. ध्येयाच्या अवचेतन मध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या कल्पनेचे रोपण करण्यासाठी देय म्हणून त्याच्या दुष्कर्माचा इतिहास पुसून टाकण्याची संधी त्याला दिली जाते. नटांमध्ये केन वातानाबे, जोसेफ गॉर्डन-लेविट, मॅरियन कोटिलार्ड, इलियट पेज, टॉम हार्डी, सिलियन मर्फी, टॉम बेरेंजर, दिलीप राव आणि मायकेल केन यांचे सामावेश आहे.
जलद तथ्य इन्सेप्शन, दिग्दर्शन ...
इन्सेप्शन | |
---|---|
![]() इन्सेप्शन | |
दिग्दर्शन | ख्रिस्तोफर नोलान |
निर्मिती |
ख्रिस्तोफर नोलान एमा थॉमस |
प्रमुख कलाकार | लियोनार्डो डिकॅप्रियो |
संगीत | हान्स झीमर |
देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | २०१० |
अवधी | १४८ मिनिटे |
निर्मिती खर्च | $ १६ कोटी |
बंद करा