From Wikipedia, the free encyclopedia
आचे (देवनागरी लेखनभेद: आचेह ; बहासा इंडोनेशिया: Aceh ;) हा इंडोनेशिया देशाचा एक विशेष प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या उत्तर टोकास वसलाआहे. भारताचा अंदमान आणि निकोबार प्रदेश अंदमानचा समुद्रात आच्याच्या उत्तरेला वसला आहे.
आचे Aceh | |||
इंडोनेशियाचा प्रांत | |||
| |||
आचेचे इंडोनेशिया देशामधील स्थान | |||
देश | इंडोनेशिया | ||
राजधानी | बांदा आचे | ||
क्षेत्रफळ | ५८,३७६ चौ. किमी (२२,५३९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४४,८६,५७० | ||
घनता | ७६.९ /चौ. किमी (१९९ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | ID-AC | ||
संकेतस्थळ | http://acehprov.go.id/ | ||
इंडोनेशियातील सर्वाधिक मुस्लिम जनता आचे येथे वसलेली असून येथील काही कायदे शारियानुसार चालतात. आग्नेय आशियामधील इस्लाम धर्माची जडणघडण आचे येथेच झाली असे मानले जाते.
२००४ साली झालेल्या हिंदी महासागरातील प्रलयंकारी त्सुनामीमध्ये आचे प्रांत मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाला. एकूण २.२६ लाख मृत इंडोनेशियन लोकसंख्येचा मोठा हिस्सा आचे प्रांतामधून होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.