असिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍ ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉनची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.

जलद तथ्य असिन तोट्टुंकळ (मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍.), जन्म ...
असिन तोट्टुंकळ
(मल्याळम: അസിന്‍ തോട്ടുങ്കല്‍.)
Thumb
असिन तोट्टुंकळ
जन्म असिन तोट्टुंकळ
ऑक्टोबर २६ १९८५ [वय् २४ वर्षे]
कोच्ची , केरळ
इतर नावे मलबार अळगी,चेन्नै,तमिळ अम्मायी .
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात.
कारकीर्दीचा काळ सन २००१-पासुन
भाषा मल्याळम
प्रमुख चित्रपट गजनी (चित्रपट)
पुरस्कार फिल्मफेअर,स्टारडस्ट,स्क्रीन,IIFA,ITFA इत्यादी.
वडील जोसेफ तोट्टुंकळ
आई सेलीन तोट्टुंकळ
बंद करा

तेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारमहिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.


पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण

मूळची केरळची असणारी असिन, केरळी असून तिची मातृभाषा मल्याळम आहे,त्या व्यतिरिक्त तिचे तमिळ, संस्कृत, तेलुगू, इंग्रजी, हिंदी तसेच फ्रेंच भाषांवर प्रभुत्व आहे. मुंबईत आल्यानंतर ती मराठी देखील शिकली आहे असे तिने एका मुलाखतीत नमूद केले. असिन ही आपल्या नावाचा अर्थ 'शुद्ध' किंवा 'पापरहित' असा सांगतात. तिच्या नावातील ’अ’(A)हे अक्षर संस्कृत मधून घेण्यात आले असून ’सिन’ (Sin-पाप) हे इंग्रजी भाषेतून घेतले आहे. दोहोंचा मिळून ’अ+सिन’, पापरहित असा होतो. चित्रपटात येण्यापूर्वी असिनने स्थानिक कंपन्यांच्या जाहिरातीतून काम केले आहे, तसेच काही नामांकित कंपन्यांची ती "ब्रॅंड अम्बॅसेडर" देखील आहे.

जाहिराती आणि ब्रॅंड अम्बॅसेडरशीप

चित्रपट कारकीर्द

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्षचित्रपटभाषाव्यक्तिरेखाइतर नोंदी/पुरस्कार
2001नरेंद्रन मकन जयकांतन वकमल्याळमस्वाती
2003अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायीतेलुगूचेन्नै'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तेलुगू)
शिवमणी 9848022338तेलुगूवसंता'विजेती', संतोषम सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक,सुपरहिट
2004लक्ष्मी नृसिंहतेलुगूरूख्मिणी
घर्षणतेलुगूमायासुपरहिट
एम.कुमरन सन ऑफ महालक्ष्मीतमिळमलबारसुपरहिट
2005चक्रमतेलुगूलक्ष्मी
उळ्ळम केट्कुमेतमिळप्रिया
गजनीतमिळकल्पना'विजेती', फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक (तमिळ)
मजातमिळसीतालक्ष्मीसुपरहिट
सिवकासीतमिळहेमासुपरहिट
2006वर्लारूतमिळदिव्या
अण्णावरमतेलुगूऐश्वर्या
2007आळ्वारतमिळप्रिया
पोक्किरीतमिळश्रृतीसुपरहिट
वेलतमिळस्वातीसुपरहिट
2008दसावतारमतमिळकोदै राधा,
अंडाळ
'विजेती', ITFA Best Actress Award
नामांकन, विजय सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक
नामांकन, विजय आवडती नायिका पारितोषिक
गजनीहिंदी भाषाकल्पना शेट्टी'विजेती', फिल्मफेअर Best Hindi Debut Award
'विजेती', IIFA Best Debut Award
'विजेती', Star Screen Best Female Newcomer Award
'विजेती', Stardust Female Superstar of Tomorrow Award
नामांकन, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट नायिका पारितोषिक
2009लंडन ड्रिम्सहिंदी भाषाप्रियासर्वसाधारण प्रतिसाद
2010कावलनतमिळमीरा२४ डिसेंबर २०१० प्रदर्शन
2011रेडी (2011)हिंदी भाषासंजना२०११ प्रदर्शन
बर्फीहिंदी भाषाजाहीर- पुर्वनिर्मितीत
रेस २हिंदी भाषाजाहीर- पुर्वनिर्मितीत
पॉकेटमारहिंदी भाषाजाहीर- पुर्वनिर्मितीत
बंद करा

हे सुद्धा पहा

संदर्भदूवे

बाह्य दुवे

(आयएमडीबी वरील पृष्ठ)

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.