भाषालंकार
भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या शब्दकृती / From Wikipedia, the free encyclopedia
अलंकार म्हणजे कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख काव्यात्मक अलंकार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अलंकार (निःसंदिग्धीकरण).
अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.