Map Graph

सारडे

सारडे हे कोकणातील रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे, हा आगरी समाज शूद्ध क्षत्रिय समाज आहे, जो राजा नहुष ह्याचे नातु राजा ययाति राजाचा वंशज बळिभद्र राजा व त्यांची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगळा ह्यांचा वंशज आहे जो मुंगी, पैठण वरून क्रमाक्रमाने कोकणात आले तरी काही क्षत्रिय ७०० वर्षां पुर्वी बिंब राजाबरोबर क्षत्रिय सैन्य म्हणून उत्तर कोकणात आले होते व कायमस्वरुपी येथेच स्थायिक झाले, कालांतराने हे क्षत्रिय सैन्य मिठ, शेती, मासेमारी, फळभाजी उत्पादनाकडे वळले व आजपर्यंत येथे शेती करत आहेत, ज्याची हद्द पाताळगंगा नदी पर्यंत भिडलेली आहे, हे गाव ही नवी वस्ती आहे, ह्या गावाचे मुळ गाव वशिने हे गाव होते तर सारडे गाव हे त्याचा पुर्वी पाडा होता, पाडा म्हणजे उपविभाग शिलाहार साम्राज्याच्या काळात पाडा हा शब्द रुढ झाला.

Read article
Nearby Places
उरण