दादरा आणि नगर-हवेली
दादरा आणि नगर-हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे. गुजराती व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भात व रागी ही येथील प्रमुख पिके आहेत.
Read article