Map Graph

डॉ. आंबेडकर नगर

मध्य प्रदेशातील एक लष्करी छावणी

डॉ. आंबेडकर नगर, जूने नाव: महू, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी MHOW वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे भीम जन्मभूमी स्मारक आहे. सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महूचे नाम बदलून "डॉ. आंबेडकर नगर" असे ठेवले. येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले. येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे.

Read article
चित्र:Dr._Bhimrao_Ambedkar_Memorial_Mhow.jpg